Breaking News

जी.के.एन.कंपनीच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव

 अहमदनगर । प्रतिनिधी । 14 - अहमदनगर मधील औद्योगिक प्रगती बहरत आहे. त्यामुळे कामगारांनी व अधिकार्‍यांनी कोणत्याही कंपनीमध्ये काम करताना कंपनीची प्रगती म्हणजेच स्वत:ची व कुटूंबाची प्रगती आहे, असे समजून काम केल्यास निश्‍चितच आपण अधिक यशस्वीतेकडे वाटचाल करु असे उद्गार जी.के.एन.कंपनीचे प्लँट डायरेक्टर राजेश मिराणी यांनी केले.
जी. के. एन. कंपनीतील कर्मचार्‍यांच्या कला - क्रिडा व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या पाल्यांचा सत्कार सोहळा व कौटुंबिक स्नेहमेळावा माऊली सभागृहात नुकताच आयोजित करण्यात आला; त्याप्रसंगी ते बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कंपनीचे पिंपरी चिंचवड येथील प्लँट डायरेक्टर राहुल काळे, श्रीमंत शितोळे, उज्वल भटाचार्य, संभाजी शिंदे, देवेंद्र अकोलकर, ऋषी सर आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
मिराणी पुढे म्हणाले, आपल्या सर्वांच्या एकत्रित सहकार्यामुळेच आज जगभरातील जी. के. एन. कंपनीच्या सर्व लँटमध्ये नगरच्या प्लँटचा तिसरा क्रमांक लागतो, ही आपल्या दृष्टीकोनातून अभिमानाची बाब असून, यापुढेही काम करताना मनापासून करा. एकमेकांना सहकार्याच्या भावनेतून पहा. धन सर्वचजण कमवितात परंतु एकमेकांची मने जोडण्याचा प्रयत्न करा. निश्‍चितच यातून आपली प्रगती आधिक उंचावेल. 
याच कार्यक्रमात जी.के.एन. कंपनीमध्ये 25 वर्षांपासून कार्यरत असलेले अविनाश केदारी यांचा सपत्नीक भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. राजेश मिराणी यांनी कंपनीतर्फे सामाजिक जाणिवेतून स्नेहालय, सावली, माऊली प्रतिष्ठान या शहर व परिसरातील उपेक्षितांसाठी उत्तम काम करणार्‍या संस्थांना भरीव अशी मदत कंपनी सतत करुन हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो, अशाचप्रकारची मदत यापुढे सुरु राहील, असे आश्‍वासन त्यांनी दिले.
राहुल काळे यांनीही याप्रसंगी समयोसूचित भाषण करुन आयोजित करण्यात आलेल्या कौटुंबिक स्नेहमेळाव्याच्या कार्याक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमाप्रसंगी शुभम क्रिएशन, मुंबई हा खास कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांच्या मनोरंजनासाठी मराठी व हिंदी गितांचा सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याचा सर्वांनी निखळ आनंद घेतला. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी कंपनीचे एचआर प्रमुख देवेंद्र अकोलकर, अभिजित कुलकर्णी, संग्राम कदम, सुभाष कबाडी, शिवा कोकाटे, प्रफुल्ल अकोलकर, मोटे व गुडघे तसेच अहमदनगर वर्क्स युनियनचे मिलिंद जपे, सुरेश जाधव, बाळासाहेब निर्मळ, विजय मचे, बाळासाहेब केदारी, रामकिसन वाळके, पी.एस.कडूस, दत्तात्रय वाबळे आदिंनी परिश्रम घेतले. शेवटी मिलिंद जपे यांनी आभार मानले.