Breaking News

अहमदनगरकरांनी राष्ट्रमाता जिजाऊंना विसरु नये ः वाकळे


 अहमदनगर । प्रतिनिधी । 14 - अहमदनगर ही स्वराज्याची जन्मभूमी आहे. शिवरायांचे आजोबा मालोजी राजे, लखुजी जाधव, शहाजीराजे व जिजाऊंची आपले शहर कर्मभुमी आहे. इतिहास संशोधक नेहमी म्हणातात कि शिवरायांच्या स्वराज्याची बिजे शोधायची असल्यास ती अहमदनगरच्या निजामशाहीत मिळतात. आपल्या शहरातील वस्तू संग्राहलयात शहाजी राजे व जिजामाता यांचा एकमेव दुर्मिळ पुतळा आहे. महाराष्ट्रात जे शेलके पुतळे असून, त्यातील हा एक महत्वाचा आहे. आपल्याच शहरात आज ज्या ठिकाणी अर्बन बँक आहे तेथे मालोजी राजेंचा महाल होता व याच भागाला ‘शहाजी मोहल्ला’ असे नाव होते येथेच शहाजी राजे व जिजामाता यांचे वास्तव्य होते. अहमदनगरच्या इतिहसात जिजाऊंचे नाव आजरामर असून, शहरवासीयांनी जिजाऊंना विसरु नये, असे प्रतिपादन कॉ.बहिरनाथ वाकळे यांनी केले.
इतिहासप्रेमी मंडळातर्फे जिजाऊ जयंतीनिमित्त वस्तू संग्रहालयातील जिजाऊ व शहाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी राजूभाई शेख, आबीद दुलेखान, आदित्य वडवणीकर, अभिजित वाघ, ठुबे पाटील, कॉ.नानासाहेब जाधव, शंकर वाघ, कॉ.बहिरनाथ वाकळे, महेश मांढरे, आसीफ दुलेखान, कॉ.रामदास वागस्कर, कॉ.अतुल महारनोर, कॉ.दत्ता वडवणीकर, वस्तू संग्रहालयाचे आनंद कल्याण, नारायणराव आव्हाड, बापू मोढवे, अतुल लहारे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबीद दुलेखान यांनी केले तर आभार राजूभाई शेख यांनी मानले. कार्यक्रमास इतिहासप्रेमी मंडळ, मखदुम सोसायटी, राजूभाई मित्र मंडळ, संभाजी बिग्रेड, मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.