Breaking News

मुंबई - नाशिक बुलेट ट्रेन, मुख्यमंत्र्यांचा केंद्राकडे प्रस्ताव


मुंबई : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गानंतर आता नाशिकही बुलेट ट्रेनच्या नकाशावर येण्याची शक्यता आहे. कारण राज्य सरकारने मुंबई नाशिक मार्गासाठी बुलेट ट्रेन म्हणजेच हायस्पीड रेल्वेचा प्रस्ताव तयार केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासह थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत पत्र लिहिले आहे. येणार्‍या अर्थसंकल्पात या मार्गाला तत्वतः मान्यता मिळावी अशी मागणी या पत्रात केली आहे. अर्थसहाय्य मिळावे यासाठी जपानच्या जायका कंपनीकडे प्रयत्न केले जाणार आहेत. याआधीच मुंबई - अहमदाबाद या बुलेट ट्रेनच्या मार्गाला तत्वत ः मान्यता मिळाली आहे. या मार्गाचा आराखडा करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मुंबई-नाशिक हा सुमारे 180 किमीचा बुलेट ट्रेन मार्ग बांधतांना सह्याद्री डोंगररांगेला भेदण्याचे मोठे आव्हान असणार आहे.