सिलींग जमीनीवर हक्क सांगणार्या इनामदारांचे अपील नामंजूर
बीड,दि. 9 - प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी आहे की, मौजे मादळमोही ता.गेवराई येथील जमीन सर्व्हे नं.516 व 517 ही शासनाने फारफार क्र.2239 व 2241 (सिलींग अॅण्ड होल्डींग अॅक्ट 1961 )नुसारताब्यात घेऊन फेरफार क्र.2240 व 2242 नुसार भूमीहीनांना दिनांक 10-6-1976 ला वाटप व हक्क दिले होते. त्यांच्या विरोधात सय्यद मोबीन सय्यद असदुल्ला यांचे वारस सय्यद राशेत सलीम पि.सय्यद मोबीन यांनी या फारफार विरोधात अपील क्र.59/2014 मा.उपविभागीय अधिकारी बीड यांच्या न्यायालयात दाखल केले होते.
अपीलार्थी यांनी सदरील जमीन वाटप बेकायदेशीर आहे असे म्हणुन कलम 5 हैद्राबाद अतियात इन्कायरी अॅक्ट 1952 चे उल्लंघन केलेले आहे असे समजुन तहसीलदार, गेवराई यांच्याकडे आर.ओ.आर क्र.56/87 दाखल केले होते. सदरीलचा निर्णय हा मादळमोही येथभल सिलींग जमीनधारक धुरंधरे यांना वाटप केलेल्या जमीनी बरोबर आहेत. म्हणुन अपीलार्थीचे आर.ओ.आर.नामंजुर केले होत. य विरोधात अपीलार्थीने उपविभागीय अधिकारी, बीड यांच्याकडे 85/88 आर.ओ.आर दाखल केले होते. ते दि.30-12-1988 रोजी नामंजुर केले होते. नंतर अपीलार्थी यांनी विभागीय आयुक्त औरंगाबाद यांचेकडे रेव्ह/आरआ/पिटी/149/1963 दाखल केले होते ते देखील दि.31-12-2004 रोजी नामंजुर केले. असे असतांना सुद्धा बीड येथिल मस्जीद कारंजा(चोरगल्ली) यांचे बळकावण्याचे प्रयत्नकरणार्याचे अपील मा.उपविभागीय अधिकारी बीड यांनी दि.23-12-2015 रोजी नामंजुर केले