Breaking News

हायकोर्टाने ’मेक इन इंडिया’च्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली

मुंबई, 28 -  मेक इन इंडियाचा सप्ताह महाराष्ट्रभर साजरा करण्यात येणार आहे. मात्र याअंतर्गत गिरगाव चौपाटीवर आयोजित कार्यक्रमाला हायकोर्टाने परवानगी नाकारली आहे. 
गिरगाव चौपाटीवर महाराष्ट्र नाईट हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार होता. या कार्यक्रमाला मुंबई हायकोर्टाने परवानगी नाकारली आहे. 13 फेब्रुवारीपासून ‘मेक इन इंडिया’ सप्ताह राज्यात साजरा केला जाणार आहे.
त्यानिमित्त 14 फेब्रुवारीला या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. गिरगाव चौपाटीवर असे कुठलेच कार्यक्रम घेण्यास परवानगी नाही. त्यामुळे हा कार्यक्रम घेऊ नये, इतरत्र घेण्यास हरकत नाही, मुंबई हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र नाईट या कार्यक्रमात मुंबई आणि महाराष्ट्राची संस्कृती दाखवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याने राज्य सरकार काय पाऊल उचलते, ते पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.