Breaking News

अतिक्रमण धारकांसाठी न.प.च्या विशेष सभेचे आयोजन


 बुलडाणा (प्रतिनिधी) । 09 - मा. मुंबई उच्च न्यायलय,खंडपीठ, नागपूर येथे दाखल जनहित याचिका क्र.च 51/2014 मध्ये दिनांक 27 मार्च 2015 रोजी झालेल्या निर्णयानुसार बुलडाणा शहरातील बहुतंःश सर्व रत्यावरील अतिक्रमण हटविण्यात आलेली  आहे. त्यामुळे शहरातील अतिक्रमण धारकांचके नुकसान होवून हजारो कुटुंबाचे संसार उध्दवस्त होवून त्याच्या बेरोजगारीचा मोठा प्रश्‍न उभा राहिला आहे. यावर उपाय म्हणून शहरातील उठविण्यात आलेल्या टपरीधारकांचा रोजगार सुरु राहावा या साठी त्यांना कायमस्वरूपी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच बेराजगारीचा प्रश्‍न कायमचा मिटावा याकरीहता बुलडाणा नगर परिषदेचे सदस्य संजय गावकवाड व इतर संन्माणीय सदस्यांनी नगर परिषद कायदा कलम 81/2 प्रमाणे विशेष सभेची मागणी केली होती. त्यानुसार नगरअध्यक्ष टि.डी.अंभोरे पाटील यांनी सभा नियोजीत केली आहे.
     त्यामागणी नुसार शहरातील विविध ठिकाणी असलेल्या नगर परिषदेच्या तसेच इतर शासनाचे मालकीच्या जागेवर बि.ओ.टी.तत्वावर गाळे बांधून देण्याचा निर्णय घेण्यासाठी नगर परिषद सदस्यांच्या विनंतीवरून परिषद अध्यक्ष तुकाराम अंभोरे पाटील यांनी बुलडाणा नगर परीषद कार्यालयाचे सभागृहात दिनांक 11 जानेवारी 2016 रोजी सकाळी ठिक 11 वाजता विशेश सभेचे आयोजन केले आहे. सदर दिनांक 11 जानेवारी 2016 रोजी संपन्न होणार्‍या विषेश सभेत अतिक्रमण हटविण्यात आलजेल्या गरूजू टपरी धारकांना व लघ्ज्ञु व्यवसायीकांना बुलडाणा शहरातील विविधि ठिकणी असलेल्या शासकिय जागेवर कायमस्वरुपी गाळे बांधून देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर व्यास पार्कच्या पपश्‍चिमेकडील जागेवर तात्काळा 754 दुकान गाळ्यिंना सुरूवात करण्यात येवून यासंपूर्ण परिसयरातील गरजू व ज्यांची दुकाने खाजगी कॉम्प्लेक्स मध्ये नाहीत अशांना समाविष्ठ केल्या जाणार आहे.  तसेच कानडे शास्त्री शाळे लगतच्या नगर परिषदच्या मालकीच्या जागेवर किमान 40 अतिक्रमण धारकांना व अजिसपूर रोडवरील नगर परिषदेने बांधलेल्या दुकानगाळ्यांच्या पश्‍चिमेकडील नगर परिषद मालकीच्या खुल्या जागेवर 20 दुकानगाळ्यांना ना नफा ना तोटा या तत्वावर आठ दिवसाचे आत सूरवात करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नगर परिषदेने बांधलेल्या एकता नगर नाट्यगृहातील 17 दुकाने ,तसेच अजिसपूर रोडवरील 14 दुकाने,जुने मार्केटमधील 22 दुकानगाळे ,आठवडी बाजारातील नगर परिषद मालकीचे 40 दुकाने यांचा जाहिर लिलाव दि.20 जानेवारी 2016 पूर्वी करून त्याठिकाणी प्राध्यान्याने सर्वलघुउद्योजकांना बसविण्यात येईल. ह्या स्थायी व अस्थायी स्वरूपाच्या दुकानगाळ्यांसोबतच नगर परिष्उेने पेट्रोपपांजवळील  जागेवर किमान 100 दुकानगाळे ,कासरंजा चौक उर्दु शाळेच्या जागेवर किमान 110 दुकानगाळे गुप्ता शाळेलगतच्या परिसरात 26 दुकान गाळे ,जयस्तंभ चौकाजवळील नझूल शिट क्रमांक  9 ए या जागेवर 50 दुकान गाळे,नगर पलिका शाळा क्रमांक  1 च्या जागेवर किमान 30 दुकाने गाळे बि.ओ.टी. तत्वावर बांधण्याची पूर्ण प्रशासकीय तयारी केली असून त्यामध्येही लघुउद्योजकांना  प्राधान्य देण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेवर अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या निवासस्थान परिसरामध्ये दुकान गाळे उभारणे, सरक्युलर रोड लगत असलेल्या जिल्हा परिषद पदाधिकार्‍यांच्या बंगल्याच्या परिसरातील जागेवर दुकानगाळे बांधणे बाबत संबंधीत विभागास नगर पालिका विनंती करणार आहे. तसेच एस.पी.ऑफीस समोरील डी.एड. काज्लेजच्या मैदानातील जागेवर 46 आर जमीनीवर नगर परिषदेचे टाउनहॉलचे आरक्षण आहे. त्याठिकाणी तळमलजा व पहिजा मजला असे मिळून किमान 200 दुकान गाळे व टाउनहॉलचे बांधकाम करण्यात येणार असल्याचे समजते.