Breaking News

5 जानेवारीला दुधना नदीपात्रात पाणी सोडणार


परभणी, दि.04 -निम्न दुधना प्रकल्पामधुन 7 दलघमी.पाणी नदीपात्रात पाणी सोडण्या बाबत  जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.यावेळी, आमदार.विजय भांबळे,आमदार डॉ.राहुल पाटील, व संबंधीत यंत्रणेचे अधिकारी, तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.      जिल्हयात सद्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असुन सर्व जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे याबाबत यावेळी चर्चा झाली.जनतेस पिण्याचे पाणी मिळावे यासाठी आवाहन करण्यात आले.
      दुधना नदीमध्ये निम्न दुधना धरणातुन 7 द.ल.घ.मी.पाणी नदी पात्रात 5 जानेवारी रोजी सोडण्यात येणार आहे.निम्न दुधना धरणातुन डावा कालव्यात पाणी सोडण्यात आल्यामुळे जवळपास 50000 हेक्टर.क्षेत्र सिंचीत झाले आहे परंतु शेतकरी यांनी पाणी अर्ज दिले नाही व पाणपटटी दिली नाही त्यासाठी तात्काळ पाणी अर्ज व पाणी पटटी भरावी अन्यथा दुस-या रोटेशनचे पाणी सोडता येणे शक्य होणार नाही. निम्न दुधना प्रकल्पातील बॅक वाटर मधील हंगामी उपसा चालु आहे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून,पाणी टंचाईवर मात करण्यासाठी व जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी उपसा तात्काळ बंद करण्यात यावा.पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्यामुळे कोणत्याही शेतक-यांनी पिण्याचे पाणी सिंचनासाठी वापरु नये,अन्यथा संबंधीताविरुध्द नियमाप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात येतील तसेच उद्रभवापासून एक किलोमीटर परिसरातील विहीरीतुन पाण्याचा उपसा करता येणार नाही,उपसा केल्यास संबंधीतांविरुध्द कडक कार्यवाही करण्यात येईल असे निर्देश यावेळी देण्यात आले.
      परभणी शहराला पाणीपुरवठा करणा-या राहाटी येथील पुर्णा नदीवरील बंधा-यातील पाणी उपसा होत असल्याचे निदर्शनास आले असल्यामुळे,अवैध उपसा करणा-या व्यक्ती विरुध्द फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.त्यामुळे राहाटी बंधा-यातुन अवैध उपसा करु नये असे आवाहन आमदार.विजय भांबळे,आमदार.डॉ.राहुल पाटील, तसेच जिल्हाधिकारी,परभणी यांनी केले आहे.