Breaking News

मोदींवर केलेली ‘ती’ टिप्पणी चुकीची - प्रेम शुक्लां


मुंबई , 22 - शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या हिंदी आवृत्तीचे माजी कार्यकारी संपादक प्रेम शुक्ला यांनी काल अखेर भाजपात अधिकृत प्रवेश केला. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीत शुक्ला यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. यावेळी शुक्ला म्हणाले, शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आहे. राष्ट्रीय हित व राष्ट्रवाद लक्षात घेऊन मी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला.
पत्रकारांशी बोलताना शुक्ला म्हणाले, शिवसेनेत काम करताना मला राष्ट्रवादाच्या कामात झोकून देता आले नाही. शिवसेना पक्षाची एक मर्यादा आहे. कारण तो राष्ट्रीय पक्ष नाही. त्यामुळे मी राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेच्या दोपहर का सामनाच्या माध्यमातून शुक्ला यांनी आपल्या लेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडक शब्दात टीका केली होती. शुक्लांनी ‘मोदींचा बाप’ काढला होता. तरीही भाजपने त्यांना सामील करून घेतले आहे. मुंबई भाजपमध्ये उत्तर भारतीय नेत्यांची कमी भरून काढण्यासाठी शुक्लांना पक्षात घेतल्याचे बोलले जाते. पंतप्रधान मोदी यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त टिप्पणीबाबत शुक्ला म्हणाले, ते माझे अज्ञान होते. मी तसे म्हणायला नको होते, ते चुकीचे होते. जेव्हा मला माझी चूक कळली तेव्हा मी सामना सोडायचा निर्णय घेतला. आता मी भाजपात आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पाडणार आहे. आशिष शेलार यांनी सांगितले की, शुक्ला यांना उत्तर प्रदेश व्हाया दिल्ली-मुंबईपर्यंत काम करण्याची संधी दिली जाईल. पक्षातील काही नेत्यांच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शुक्ला महत्त्वाची भूमिका पार पाडतील.
शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या हिंदी आवृत्तीचे माजी कार्यकारी संपादक प्रेम शुक्ला यांनी काल अखेर भाजपात अधिकृत प्रवेश केला. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीत शुक्ला यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. यावेळी शुक्ला म्हणाले, शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आहे. राष्ट्रीय हित व राष्ट्रवाद लक्षात घेऊन मी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला.