Breaking News

ऑनलाईन टवाळखोरांना मुंबई पोलिसांचा सावधतेचा ‘ई’-शारा


मुंबई, दि. 22 : सोशल नेटवर्किंग साईटवरुन आक्षेपार्ह पोस्ट करुन स्वतःला अडचणीत आणणार्‍या ट्विटराईट्सचे कान मुंबईचे पोलिस आयुक्त अहमद जावेद यांनी टोचले आहेत. तिच्या फोटोवरील असभ्य कमेंटमुळे तुम्हाला आमच्या सोबत दीर्घकालीन डेटवर यावं लागेल असं उपहासात्मक ट्वीट करुन त्यांनी टवाळखोरांना सावधतेचा इशारा दिला आहे. 
जावेद अहमद यांच्या वनलाईनर इशार्‍याला दीड हजारांहून अधिक रिट्वीट्स तर हजाराच्या घरात फेव्हरिट्स आले आहेत. मुंबई पोलिसांनी सायबर सिक्युरीटी सप्ताहाचं आयोजन केलं असल्यामुळे अशा प्रकारचे ट्वीट्स हा शहाण्यांना शब्दाचा मार आहे. काही गुन्हेगार कीबोर्डला त्यांचं शस्त्र म्हणून वापरतात, 140 कॅरेक्टर्समध्ये तुमचं नशिब लिहिलं जाऊ देऊ नका, अशा अनेक ट्वीट्सना ट्विटराईट्सचा प्रतिसाद मिळत आहे.