Breaking News

निष्ठावान कार्यकर्त्यांना पक्ष योग्यवेळी संधी देतो - आ.राहुल बोेंद्रे


 चिखली (प्रतिनिधीे) । 04 - कॉगे्रसच्या मुख्य प्रवाहासोबत राहिले तर, गावाचाही विकास नक्कीच होईल. आणी समविचारी कार्यकर्ते जर एकजुटीने एकत्र काम करायला लागले तर मतदार संघाचे चित्र पालटल्याशिवाय राहणार नाही. चिखली मतदार संघातील वेगवेगळया पक्षात असलेले अनेक चांगले जुने कार्यकर्ते पुन्हा कॉगे्रसमध्ये म्हणजे स्वगृही परत येत आहेत ही आनंदाचीच गोष्ट आहे असे उद्गार आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी गांगलगांव येथील मदनराव म्हस्के व कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमाच्या वेळी काढले. माजी आमदार बाबुरावजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष डॉ. सत्येंद्र भुसारी, बाजार समितीचे सभापती विष्णु पाटील, जि.प. सदस्य अशोकराव पडघान, कुउबास संचालक सचिन शिंगणे, तालुका युवकचे अध्यक्ष रमेश सुरडकर, शहर अध्यक्ष तुषार भावसार, 
प.स.सदस्य लक्ष्मण आंभोेरे, विजय शेजोळ, किशोर आराख यांची प्रमुख उपस्थिती होती.   या दरम्यान आमदार निधीतूून तयार करण्यात आलेल्यो 8 लक्ष रूपयाच्या सिमेंट रस्त्याचे लोकार्पण व जिल्हा परिषद सदस्य अशोकराव पडघान यांच्या निधीतुन स्मशानभुमी कडे जाणार्‍या रस्त्याचे लोकार्पणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार बाबुराव पाटील यांनी आपल्या भाषणात कॉगे्रसच्या जुन्या काळातील आठवणींना उजाळा दिला. आणी गांगलगांव परीसरामध्ये सतत 10 वर्ष सदस्य, 15 वर्ष ग्रामपंचायत सरपंच राहिलेेले, विविध पदावर काम केलेल्या मदनराव म्हस्के आणी त्यांच्या सहकार्‍यांचे पक्ष प्रवेशाबध्दल स्वागत केले. कॉगे्रस पक्ष हा सर्वसामान्य व दिनदलीतांसाठी नेहमीच काम करत आला आहे. धर्मनिरपेक्षपणे काम करणार्‍या आणी सर्वांना सोबत घेवून चालणाच्या मदनराव म्हस्के व कार्यकर्त्यांमुळे पक्षाच्या कार्याला आता बळकटी येईल असे मत त्यांनी व्यक्त केले. आमदार राहुलभाउ बोेंद्रे पुढे बोलतांना म्हणाले की, जिकडे सत्ता तिकडे धाव घेण्याचा संधी साधूपणा नेहमी दिसत असतो. मात्र हे कार्यकर्ते सत्ता नसतांना सुध्दा कॉगे्रसमध्ये येत आहेत, याचा अर्थ जनतेची कामे करण्यासाठी एकजुटीने चांगल्या विचारा सोबत राहण्याचा त्यांचा हेतू आहे. आणी निरपेक्ष भावनेने काम करणार्‍या कार्यकर्त्यांचे मोल हे नक्कीच पक्ष केल्याशिवाय राहत नाही, योग्य वेळी योग्य संधी निष्ठावंताना मिळत असते असे सांगुन गावकर्‍यांच्या मागणीला प्रतिसाद देत 5 लक्ष रूपयाच्या सभामंडपाची मागणी त्यांनी तात्काळ मंजुर केली. मान्यवरांच्या हस्ते कॉगे्रस पक्षात प्रवेश घेणार्‍या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.  
याप्रसंगी डॉ.सत्येंद्र भुसारी, सचिन शिंगणे, विष्णु पाटील, अशोकराव पडघान, मदनराव म्हस्के, यांची समायोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचलन बृहस्पती म्हस्के तर आभार प्रदर्शन प्रल्हाद म्हस्के यांनी केले. यावेळी मदनराव म्हस्के, नंदकिशोर धोंडगे, अशोक भाकडे, अजिस भाई, बाळु पाटील, यांच्यासह गांगलगांव येथील माजी सरपंच बबनराव म्हस्के, नितीन मधुकर म्हस्के, दिलीप सावळे, लक्ष्मण काका, आत्माराम पवार, विष्णु पवार, समाधान म्हस्के, शिवशंकर शेळके, समाधान कुंडलीक म्हस्के, छत्रग्घन म्हस्के, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी कॉग्रेक्ष पक्षात प्रवेश घेतला.