Breaking News

डोंगरे वसतिगृहाजवळ दुचाकीस्वारास लुटले


नाशिक ः शनिवारी (दि.19) -  दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास डोंगरे वसतिगृह मैदानाजवळून दुचाकीवरून जात असताना दिगंबर दयाराम शेवाळे (30) यांना हाक मारून लक्ष विचलित करत थांबवून तीन लुटारुंनी मारहाण करत दुचाकीवरून खाली पडलेली नोटांची पिशवी घेऊन पळ काढल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.
शेवाळे हे दुचाकीवरून कॉलेजरोडकडे जात होते.  यावेळी तिघा तरुणांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना पुन्हा अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एक हजार, पाचशे, शंभर-दोनशे रुपयांच्या नोटा असलेल्या  31 हजार 570 रुपयांची रोकड असलेली पिशवी घेऊन पळ काढल्याचे शेवाळे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.