झोपडी धारकांनाही भरावा लागणार प्रॉपर्टी टॅक्स
मुंबई/प्रतिनिधी । 14 - झोपडपट्ट्यांयमध्ये राहणार्या लोकांनाही प्रॉपर्टी टॅक्स (मालमत्ता कर) एप्रिल महिन्यापासून भरावा लागणार आहे. वार्षिक 4800 रुपयांपासून 31,500 रुपयांपर्यंत झोपडपट्टी धारकांना प्रॉपर्टी टॅक्स भरावा लागू शकतो.
झोपडपट्ट्यांना अहमदाबादमध्ये कर लागू केल्यानंतर आता मुंबई महान
गरपालिकेनेही शहरात हा निर्णय अंमलात आणण्यासाठी कायद्यात सुधारणा केली आहे. यासाठी महापालिका लवकरच झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासंबंधित प्रस्ताव बीएमसी लॉ समितीच्या बैठवकीत लवकरच मंजुरीसाठी सादर केला जाईल. मात्र या प्रस्तावाचा सेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपने विरोध केला आहे. झोपडपट्टीधारकांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा दिल्या जात नाहीत मग कुठल्या आधारावर महापालिका हा कर वसूल करणार? असा प्रश्न भाजपने विचारला आहे. उल्लेखनीय म्हणजे, झोपडपट्टी धारकांकडून प्रत्येक महिन्याला 100 रुपये आणि अनधिकृत झोपडीधारकांकडून 250 रुपये सेवा कराच्या रुपात वसूल केले जात होते. त्याऐवजी प्रॉपर्टी
टॅक्स लावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर 2014 मध्ये नेमलेल्या समितीने मात्र झोपडपट्टीवासियांकडून रेडी रेकनरनुसार प्रॉपर्टी टॅक्स लावण्यात यावा, अशी शिफारस केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
