Breaking News

दहशतवाद्यांनी हल्ला; 15 जण मृत्यूमुखी, चार दहशवाद्यांना कंठस्थान

इस्लामाबाद, 20 -  वायव्य पाकिस्तानमधील चरसड्डा जिल्ह्यातील बचा खान विद्यापीठात 10 दहशतवाद्यांनी हल्ला केला असून, यामध्ये तीन हजार विद्यार्थी अडकून पडलेत. दरम्यान, दहशतवाद्यांनी तब्बल 70 विद्यार्थ्यांच्या डोक्यात गोळ्या घातल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, 15 जण मृत्यूमुखी पडले.
तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP)
 या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. आतापर्यंत एका प्राध्यापकासह 3 लोक ठार झाल्याचे वृत्त आहे. हा हल्ला ‘सीमांत गांधी’ नावाने प्रसिद्ध असलेल्या भारतरत्न मशहूर खान अब्दूल गफ्फार खान यांच्या पुण्यतिथी सोहळ्यात झाला. खान यांचा भारतरत्न पुरस्काराने गौरव झालेला आहे.  पाकिस्तानमध्ये व्हीआयपीच्या सुरक्षेची जबाबदारी असलेली स्पेशल कमांडोची टीम विद्यापीठात गेली.