Breaking News

वायदे बाजाराला विरोध करणारे शेट्टीच शेतकर्‍यांचे दुश्मन


सांगली ः दि. 14 - वायदे बाजारामुळे शेतकर्‍यांना फायदाच होतो आहे. वायदे बाजाराला विरोध करणारे शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी शेतकर्‍यांचे दुश्मन आहेत, अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते  रघुनाथदादा पाटील यांनी केली. ऊसदरासह शेतकरी विरोधी धोरण केंद्र व राज्य सरकार घेत आहे. त्याला विरोधासाठी संघटनेतर्फे शेतकरी महाअधिवेश शिर्डी येथे शुक्रवारपासून (15) तीन दिवस होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, बाजारपेठेचा अंदाज घेऊन धान्यांचे भाव ठरवले. राजूशेट्टी बैलगाडी शर्यतीवरील उठवलेल्या बंदीचे श्रेय घेतात. त्यांना ही बंदी घातली त्यावेळी कोठे होता याची आठवण करुन द्यावी लागेल.
ते म्हणाले, म्हैसाळ योजनेची पाणीपट्टी शेतकर्‍यांच्या ऊसबिलातून कारखान्यांना कपात करता येणार नाही. पाटबंधारे विभागालाही तसे अधिकार नाहीत. कारखान्यांकडून वसुली बेकायदा आहे. शेतकर्‍यांच्या ऊसबिलातून विकास सोसायट्यांचे कर्ज वगळता अन्य काहीही कपात करता येत नाही. केंद्र, राज्याच्या शेतकरी विरोधी धोरणावर हल्लाबोल करताना ते म्हणाले, शेतकर्‍यांसाठी अच्छे दिन कधी येणार, असा प्रश्‍नच आहे. सर्व हालचाली विरोधातच आहेत. भरल्यापोटी आता सेंद्रिय शेतीचे धडे शिकवले जात आहेत. सेंद्रीय की रासायनिक शेती हे शेतकर्‍यांनाच ठरवू द्या. शासन विरोधात या महाअधिवेशनात लढ्याबाबत विचार होईल.
विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन... महाअधिवेशनाचे उद्घाटन शिर्डीतील विश्‍वात्मक कोकमठाण येथे शुक्रवारी (15) सकाळी दहा वाजता सिफाचे सतनामसिंग बेरु उद्घाटन करतील. अधिवेशनातील चर्चासत्रात शुक्रवार सातवा वेतन आयोग, शेतकरी आत्महत्त्या, आरक्षण की खुली अर्थव्यवस्था, गोवंश हत्त्याबंदी, शनिवार शिक्षण 
विद्यार्थ्यांसाठी की शिक्षकांच्या पगारासाठी, अर्थक्रांती, बाजार समिती, भूसंपादन कायदा, कार्बन क्रेडिट, इथेनॉल, पीक आणेवारी, राज्यघटना-काळाजी गरज. रविवार शेतीशी निगडीत समस्या, पाणीप्रश्‍न, थेट सबसिडी, जीएम बियाणांचे वास्तव. खुले अधिवेशन सायंकाळी चार वाजता होणार आहे.