Breaking News

पल्स पोलिओ लसीकरण मोहिम यशस्वीपणे राबवा ः जिल्हाधिकारी


सांगली ः दि. 14 -  17 जानेवारी व 22 फेब्रुवारी 2016 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये राबविण्यात येणार असून ही मोहिम यशस्वीपणे राबवा, असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी आज येथे केले. 
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.बी. सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.एस. कोळी, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. बी.एस.गिरीगोसावी, आदि  मान्यवर उपस्थित होते.  पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या समन्वय समितीच्या बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी शेखर गायकवाड म्हणाले, सन 1995-96 पासून सांगली जिल्ह्यामध्ये पल्स पोलिओ लसीकरण मोहिम नियोजनबध्दरीत्या राबवून यशस्वी केली असून पोलिओ रोगाचे समूळ उच्चाटन व्हावे अशी याची संक
ल्पना आहे.
आपण अजून पोलिओ मुक्त झालेलो नाही हा आजार पूर्णपणे निघून जावा यासाठी या मोहिमेची जनजागृती होणे आवश्यक आहे.  पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत देण्यात येणार्‍या लसी पूर्णत: बर्फामध्ये ठेवणे आवश्यक असून या लसी इतरत्र पडून त्याचा विपर्यास होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.  या मोहिमेची माहिती देताना जिल्हाधिकारी शेखर गायकवाड म्हणाले की,  0 ते 5 वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ लसीचा डोस देण्यासाठी जिल्ह्यात 17 जानेवारी व 21 फेबङ्घुवारी 2016 रोजी ही मोहिम राबविली जाणार आहे.  या मोहिमेंतर्गत 1 लाख 99 हजार 842 लाभार्थी अपेक्षीत 
असून यासाठी जिल्ह्यात गङ्घामीण विभागात 1260 तर शहरी विभागात 86 अशी एकूण 1 हजार 347 लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.  लाभार्थींना 2 कि.मी. पेक्षा जास्त अंतर चालत जावे लागणार नाही याची दक्षता घेवून पल्स पोलिओ लसीकरण बुथची स्थापना करण्यात आली आहे. लसीकरणादिवशी सर्व बालकांना लस मिळावी यासाठी जिल्ह्याच्या सर्व सीमा, नाके, एस.टी.स्टॅन्ड, रेल्वे स्थानके इत्यादी ठिकाणी 145 ट्रान्सिट टीम दिवसभर कार्यरत राहणार आहेत. तसेच बांधकामाची ठिकाणे, रस्त्याची कामे, खाणकामगार, ऊसतोड कामगार, विटभट्या, मंदिरे, बगीचे, फुटपाथवरील लाभार्थी, तात्पुरत्या व फिरस्त्या वसाहती, फिरस्ते प्रसुतीगृह व खाजगी दवाखाने, तुरळक वाड्या वस्त्या इत्यादी ठिकाणच्या बालकांच्या लसीक
रणासाठी 190 मोबाईल टीम स्थापन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.  बुथवर काम करण्यासाठी 100 पर्यंत लाभार्थी असलेल्या केंद्रावर दोन व 100 ते 250 लाभार्थी असलेल्या केंद्रावर तीन याप्रमाणे प्रत्येक बुथवर लसपाजक, लेखनिक व केंद्रप्रमुख अशा 3 हजार 717 व्यक्ती व स्वयंसेवकाचीं नेमणूक करण्यात आली आहे.  
बुथवर लसीचा पुरवठा वेळेवर होण्यासाठी 130 वाहने उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. ही मोहिम अत्यंत योजनाबध्द राबविण्यासाठी लोकप्रतिनिधी, शासकीय, निमशासकीय, खाजगी क्षेत्रातील यंत्रणा व समाजातील सर्व घटकांचा सहभाग घ्यावा, अशा सूचना त्यांनी आरोग्य अधिकार्‍यांना दिल्या.  0 ते 5 वयोगटातील एकही बालक पोलिओ डोस पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊन मोहिम शंभर टक्के यशस्वी करावी असेही 
त्यांनी यावेळी सांगितले.