मुंंबईत पाच जणांना चिरडणारा कार चालक अटकेत
मुंबई, प्रतिनिधी, दि. 23 - मुंबईत भरधाव कारने पाच जणांना चिरडणारा बीएमसीचा कंत्राटदार आमिन युसूफ खान याला अटक केली आहे. पायधुनी पोलिसांनी ही कारवाई केली. क्रॉफर्ड मार्केट परिसरात काल रात्री आमिन खानच्या मर्सिडीज कारने चार महिला आणि एका लहान मुलाला चिरडलं होतं. या अपघातानंतर तो फऱार झाला होता. मात्र पोलिसांनी आज त्याच्या मुसक्या आवळल्या.
मुंबईत आणखी एक हिट अँड रनची घटना घडली आहे. क्रॉफर्ड मार्केट परिसरात एका भरधाव कारने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या पाच जणांना चिरडलं. यात चार महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जे जे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरुन फरार झाला. फरार चालक हा बीएमसीचा कॉन्ट्रॅक्टर असल्याचं कळतं. काल रात्री
सव्वाबाराच्या सुमारास हा अपघात झाला. चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि क्रॉफर्ड मार्केटजवळील मोहम्मद अली रोडच्या कडेला झोपलेल्या पाच जणांच्या अंगावर कार चढवली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी सर्व जखमींना जेजे रुग्णालयात दाखल केलं.