Breaking News

अ‍ॅड. सतिषचंद्र रोठे यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान


बुलडाणा (प्रतिनिधी), 11 - अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळ, केंद्रीय प्रचार विभाग, गरूकुंज आश्रम माझोरी अंतर्गत श्री गुरूदेव सेवा मंडळ विसंजीनगर जिल्हा जळगांव क्रांती पब्लिकेशन अमरावती ,मानवसेवा विकास फाऊंडेशन अंजनगांव सुर्जी यांच्या सयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पातळीवर दिल्या जाणारा स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय पुरस्कार 2016 आझाद हिंद संघटनेचे अ‍ॅड. सतिषचंद्र राठे यांना प्रदान करण्यात आला आहे. वंदनीय राष्टसंत तुकडोजी महाराज यांच्या 47 वा पुण्यतिधी महोत्सव व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती औचित्य साधून दिनांक 3 जानेवारी 2016 प्रदान करण्यात आला.