Breaking News

कापूस उत्पादक शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्याची मागणी


बुलडाणा, 4 - केंद्र शासनाने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना दुष्काळाची मदत देण्याची नुकतीच घोषणा केली. परंतु या दुष्काळी मदतीमध्ये कापूस उत्पादक शेतकर्‍यांना वगळण्यात आलेले आहे. विदर्भामध्ये यावर्षी संपूर्णपणे शंभरटक्के दुष्काळ असून विदर्भात कापूस व सोयाबिण इत्यादी पिका शिवाय इतर कोणतेही पिकाचे उत्पादन आले. असे असतांना सुध्दा कापूस उत्पादक शेतकर्‍यांना मदती पासून वंचीत ठेवणे हा विदर्भातील शेतकर्‍यांवर घोर अन्यायच आहे. शेतकर्‍यांना आत्महत्या करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. याकरीता शासनाने विदर्भातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी. अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य अ‍ॅड.दत्ता भुतेकर यांनी 1 जानेवारी रोजी केंद्रीय कूषीमंत्री व मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. निवेदनात नमूद आहे की, एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भात टेक्सटाईल मिलची घोषणा करू राहिले तर दुसरीकडे त्याच विदर्भातील कापुस उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देण्याऐवजी त्यांची मुस्कटदाबी करून शेतकरीवर्गाला आत्महत्या करण्यास एकप्रकारे परावूत्तच करीत आहे. प्रत्यक्षात विदर्भात कापूस हे शेतकर्‍यांकरीता महत्वाचे समजले जाणारे एकमेव पिक आहे. महाराष्ट्र सरकारने शेतकरीवर्गाला दिलासा देण्याऐवजी मदत नाकारून शेतकर्‍यांची चेष्टाच चालविली आहे. शासनाने शेतकरीवर्गाला तात्काळ मदत घोषीत करून कापूस उत्पादक शेतकर्‍यांना न्याय व मदत द्यावी यासह आदी मागण्या अ‍ॅड.भुतेकर यांनी केंद्रीय कूषीमंत्री व मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.