Breaking News

सेवानिवृत्तांची पेन्शनसाठी निदर्शने


 जळगाव/प्रतिनिधी। 10 - पाच वर्षांसाठी निवडून आलेल्या खासदार व आमदारांना पेन्शन लागू होते, मग 58 वर्ष सेवेत असणार्या सरकारी अधिकारी व कर्मचार्यांना का नाही? असा सवाल राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष योगिराज खोंडे यांनी पत्रपरिषदेत उपस्थित केला. सरकारचे धोरण हे कर्मचारीविरुध्द असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला. सरकारी कर्मचार्यांच्या प्रश्‍नावर लढा उभारण्यासाठी ते शुक्रवारी जिल्हा दौर्यावर आले होते. पेन्शन मागणीसाठी या वेळी निदर्शने करण्यात आली. दरम्यान, सरकारकडे संघटनेने महागाई भत्ता, पाच दिवसांचा आठवडा, पेन्शन योजना यासह 21 मागण्या केल्या आहेत. पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवारी धुळे येथे बैठक होत आहे.