Breaking News

औद्योगिक कारणांसाठी एनए-ची गरज नाही


मुंबई, 21 - औद्योगिक कारणांसाठी शेतजमीन एनए करण्याची गरज नाही. यापूर्वी शेतजमीनीवर बांधकाम करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडून अकृषिक परवाना म्हणजेच एनए ऑर्डर घ्यावी लागत होती. महाराष्ट्रात उद्योगांना पोषक वातावरण निर्माण म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 44 अ नुसार, औद्योगिक वापरासाठी शेतजमीन बिगर शेती करण्याची अट 1994 आणि 2005 सालीच काढून टाकण्यात आली आहे. मात्र, कलम 44 अ मधील काही जाचक अटींमुळे गेल्य वीस वर्षात त्याचा वापरच झाला नाही. शासनाच्या या निर्णयामुळे उद्योजकांची मोठी डोकेदुखी टळणार आहे. मात्र, या निर्णयामुळे शेतजमीनीचा मोठ्या प्रमाणावर बांधकाम आणि व्यावसायिक कारणांसाठी 
वापर केला जाण्याचा धोका नाकारता येत नाही.