Breaking News

अमेरिकेला शतकातील भीषण वादळाचा तडाखा, 7500 फ्लाइट्स रद्द

वॉशिंग्टन, 23 - अमेरिकेला शतकातील सर्वात भीषण वादळाचा तडाखा बसला आहे. वादळाचा सर्वाधिक फटका यूएसएच्या ईस्टर्न सिटीजला बसला आहे. हिमवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून आतापर्यंत आठ जण दगावल्याचे वृत्त आहे. वादळामुळे 7500 फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या आहेत. वॉशिग्टनमधील बहुतांश भाग बर्फाच्छदीत झाला आहे. रस्त्यावर एक ते दोन फूटापर्यंत बर्फ साचला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, यूएसमध्ये ताशी 73 किलोमीटरच्या वेगाने हिमवादळ आले आहे. वादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. ’न्यूयॉर्क टाइम्स’नुसार जवळपास 6 हजार उड्डाणे रद्द करण्यात आले आहेत. यूएसच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काही भागात अडीच ते तीन फूट हिमवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान सेवा सेंटर’चे संचालक लुईस यूसेलिनी यांनी सांगितले, की या वादळामुळे पाच कोटी लोक प्रभावित होण्याची शक्यता आहे. शतकातील सगळ्यात भीषण हिम वादळ असल्याचे अधिकार्यांनी सांगितले आहे. वाॅशिंग्टनमध्ये यापूर्वी 1922 मध्ये असेच वादळ आले होते. 71ला हिमवृष्टी झाली होती.
 अमेरिकेतील टेनेसी, नॉर्थ कॅलिफोर्निया, वर्जिनिया, नॉर्थ कॅरोलिना, मॅरीलंड, पेनसिलवेनिया कोलंबियामध्ये हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे.सरकारने बस सेवा थांबवण्यात आली असून शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. सप्लाई बाधित होने की वजह से वर्जीनिया, मैरीलैंड के ज्यादातर सुपरमार्केट खाली हो गए। सीएनएननुसार, 1 लाख 20 हजाराहुन जास्त घरामधील बत्ती गुल झाली आहे.रस्त्यांवर साचलेला बर्फ काढण्यासाठी सरकारतर्फे युद्धपातळीवर मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. बर्फ काढण्यासाठी एक हजार ट्रक सज्ज आहेत.
पाच राज्यात 1000 हून शहर वजा खेट्यात इमरजेंसी घोषित करण्यात आली आहे.