Breaking News

सैफ अली खानच्या कोट्यवधी संपत्तीवर जप्ती ?

नवी दिल्ली, 23 -  केंद्रीय गृह मंत्रालयाच्या शत्रू संपत्ती कार्यालयाने भोपाळचे शेवटचे नवाब सैफचे पणजोबा हमीदुल्ला खाँ याच्या भोपाळमधील स्थावर आणि जंगम संपत्तीला 2 हजार 168 शत्रू संपत्तीमध्ये सामील केले आहे. म्हणजे अशी संपत्ती जिचे मालक पाकिस्तानमध्ये निघून गेले आहेत आणि आता त्यावर फक्त केंद्र सरकारचा आहे. 1968 मध्ये पारित करण्यात आलेला शत्रू संपत्ती संरक्षण कायद्याला संशोधन स्वरुपाला राष्ट्रपतींनी नुकतीच मंजूरी दिली आली आहे. त्यामुळे सैफ अलीची भोपाळमधील संपत्ती जप्त होण्याची शक्यता बळावली आहे.
फेब्रुवारी 2015मध्ये देण्यात आलेल्या एका आदेशामध्ये केंद्र सरकारने भोपाळचे शेवटचे नवाब हमीदुल्ला खाँ यांच्या उत्तराधिकारी म्हणून सैफची आजी साजिदा सुल्तान यांना न मानता त्यांची मोठी बहीण अबिदा यांना मानले आहे. ज्या 1950 साली पाकिस्तानात निघून गेल्या. केंद्र सरकारने आबिदा यांना हमीदुल्ला यांच्या उत्तराधिकारी मानून त्यांच्या संपत्तीची सर्व माहिती मध्य प्रदेश सरकारकडून मागवली आहे. सैफचे पणजोबा हमीदुल्ला यांच्या निधनानंतर 1961 साली त्यांची मधली मुलगी साजिदा सुल्तानला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले होते. कारण की, त्यांची मोठी मुलगी आबिदा पाकिस्तानमध्ये निघून गेली होती. साजिदा सुल्तानचं लग्न पतौडीचे नवाब इफ्तिकार अली खान यांच्यासोबत झाला. ज्यांना एक मुलगा मन्सूर अली खान आणि दोन मुली सालेहा आणि सबीहा झाल्या. मात्र, हळूहळून पतौडी कुटुंबात संपत्तीवरुन वाद होऊ लागले. या वादाचा निकाल कोर्टात
लागण्याआधीच या संपत्तीचा शत्रू संपत्तीमध्ये समावेश करण्यात आला.