Breaking News

5 जानेवारी रोजी शिवाजी अभियांत्रिकी ‘मराठवाड्याचा युवावक्ता स्पर्धेची जिल्हानिहाय फेरी’
परभणी, दि.04 -महाराष्ट्राचे नेतृत्व शरद पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने मराठवाड्याचा युवावक्ता या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले आहे. परभणी जिल्हानिहाय फेरी 5 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेपासुन शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात होणार आहे. 
तरी स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी अध्यक्ष म.शि.प्र. मंडळाचे सहसचिव अनिलभाऊ नखाते, उद्घाटक साहेबराव खंदारे, प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा. विठ्ठल भुसारे गटशिक्षण अधिकारी पुर्णा, प्राचार्य बालाजी बच्चेवार यांची उपस्थिती राहणार आहे. मागील पाच वर्षात सलग याच स्पर्धेचे माध्यमातुन मराठवाड्यातुन अनेक युवावक्ते तयार होत आहे. या वर्षी जिल्हानिहाय फेरीसाठी राजकारणातील अजातशत्रु आर.आर. आबा, दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी विवेचकांच्या हत्या थांबणार कधी, स्वच्छता अभियान दिशा आणि दशा, आयुष्य हेच आहे हाच पेच आहे हे चार विषय ठेवण्यात आले आहे. विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे तीन, दोन व एक हजारांचे पारितोषीक दिले जाणार आहे. तसेच या तीन स्पर्धकांची 11 जानेवारी रोजी औरंगाबाद येथे होणार्‍या महाअंतीम फेरीसाठी निवड केली जाणार आहे. यावेळी बक्षिस वितरणाप्रसंगी प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, स्वराजसिंह परिहार, वंदना फुटाने उपशिक्षणाधिकारी, परभणी यांची उपस्थिती राहणार आहे. 
तरी इच्छुक विद्यार्थ्यानी महाविद्यालयाचे ओळखपत्र,प्राचार्यांचे संमतीपत्र व पासपोर्ट फोटोसह स्पर्धेच्या दिवशी एक  तास अगोदर स्पर्धा ठिकाणी नाव नोंदणी करावी असे अवाहन स्पर्धा संयोजन समितीप्रमुख केशवअण्णा दुधाटे, रणजीत काकडे, संदीप चव्हाण, मामा सुर्वे, इंजि. नारायण चौधरी, प्रा.डॉ. जयंत बोबडे, केशव शिंदे, प्रा.डॉ. आर.एस. शेख, मोतीराम शिंदे, धनंजय भागवत, गोविंद चोरघडे, गुलाब कदम यांनी केले आहे.