कॅनडात शाळेत गोळीबार; 5 जणांचा मृत्यू
ओटावा, 23 - उत्तर कॅनडातील सस्केटचेवन प्रांतात एका माध्यमिक शाळेत घुसून पाच जणांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोघे गंभीर आहेत.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी सांगितले की, सस्केटचेवन येथील ला लोश समुदायाच्या शाळेत घुसून हल्लेखोरांनी गोळीबार केला. या प्रकरणी एका संशयित हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. कॅनडात बंदूक बाळगण्याबाबतचे कायदे कठोर आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे हल्ले फार कमी प्रमाणात होतात. माँटियल येथे 1989 मध्ये ला लोश समुदायाच्या महाविद्यालयात गोळीबाराची घटना घडली होती.