Breaking News

डबेवाल्याला वेग, एकावेळी बाईकवरुन 50 डबे

मुंबई, 28 - चाकरमान्यांना वेळेवर आणि खात्रीशीर डबे पोहचवण्यासाठी  नवी मुंबईच्या भैरवनाथ पतपेढीतर्फे कर्ज उपलब्ध झाल्याने मुंबईच्या डबेवाल्यांनी 60 मोपेडची खरेदी केली आहे. 
या व्यवसायात परप्रातियांकडून निर्माण झालेले आव्हान पेलण्यासाठी मराठी डबेवाल्यांनी अपटूडेट राहण्यासाठी पावले उचलली आहेत. सध्या हे डबेवाले हातगाडी आणि सायकलचा वापर करुन घरचे जेवण चाकरमान्यांना वेळेत पोहचवतात. जेवणाचे डबे अधिक वेगाने आणि जास्त संख्येने देता यावेत यासाठी हे डबेवाले आता दुचाकीवर स्वार झाले आहेत. त्यासाठी टीव्हीएसने खास मोपेड तयार केली असून त्यावरुन एकाचवेळी 50 डबे नेता येणार आहेत. याशिवाय आता हे डबेवाले ऑनलाईन शॉपिंग कंपनीच्या वस्तू पोहोचवण्याची जबाबदारी जोडधंदा म्हणून उचलणार आहेत.