नक्षलवाद्यांच्या सुरुंग स्फोटात सात पोलिस शहीद
रांची, 28 - पलामू जिल्ह्याच्या कालापहाडी परिसरात नक्षलवाद्यांनी बुधवारी संध्याकाठी आयईडी स्फोट घडवले. झारखंडच्या छत्तरपूर भागात नक्षलवाद्यांनी केलेल्या या सुरुंग स्फोटात सात पोलिस शहीद झाले आहेत.
जखमी पोलिसांनी हेलिकॉप्टरमधून रांचीमधील रुग्णालयात हलवण्यात येत आहे. सध्या काही जणांवर पलामूमधील रुग्णालयात उपचार सुरु आहे. झारखंड पोलिसांचे प्रवक्ते एस एन प्रधान यांनी या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. नक्षलवाद्यांनी मोहुआदंड-जापला रोडवर लँडमाईन स्फोट करुन पोलिसांच्या पेट्रोलिंग व्हॅनला लक्ष्य बनवले. या व्हॅनमध्ये 13 पोलिस होते. त्यापैकी सात पोलिसांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा जण जखमी आहेत.