Breaking News

सचिनकडून मूक-बधीर विद्यालयासाठी 50 लाखांचा निधी


अहमदनगर,4 - राजकारणाचा गंधही नसलेल्या व राज्यसभेत खासदार म्हणून नेमणूक झालेल्या सचिन तेंडुलकरने आपल्या खासदार निधीतून गˆामीण भागातील मतीमंद व मूक-बधीर विद्यालयाला तब्बल 50 लाख रुपयांचा निधी देऊन एक आदर्श निर्माण केला आहे. 
अनेकदा निधी मिळताना टक्केवारी घेतली असल्याचा अनुभव आलेला असताना कोणी मध्यस्थ नसताना सचिन तेंडुलकर यांनी केलेली मदत म्हणजे एक संवेदनशील माणसाने केलेली मदत असल्याचे संस्थेचे सचिव सुर्यकांत शिंदे यांचे म्हणणे आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालक्यातील डॉक्टर देवेंद्र ओहरा निवासी मतीमंद विद्यालयाला नवीन इमारतीसाठी हा निधी देऊ केला असून एकदाही भेट झालेली नसताना केवळ संस्थेची माहिती प्राप्त झाल्यानंतर तेंडुलकर यांनी हि मदत करून मूक बधीर व मतीमंद विद्यार्थ्यांना नवीन वर्षाची भेटच दिली आहे. संगमनेर तालुक्यात संगˆाम संस्थेचे डॉक्टर देवेंद्र ओहरा मतीमंद विद्यालय आहे. गेल्या 30 वर्षांपासून या विद्यालयात अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असून विविध क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याच काम सुरु आहे. विद्यालयाला नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव तयार असून त्यासाठी तब्बल 2 कोटींचा खर्च अपेक्षित असून यासाठी संस्थेच्या वतीन  विविध ठिकाणी मदतीसाठी प्रस्ताव देण्यात आले होते. काही ठिकाणी मदत मिळाली तर काही ठिकाणी निराशा पदरात आली. प्रस्ताव पाठवत असताना सचिन तेंडुलकर यांनाही भेटण्यासाठी शाळेचे मंडळ गेले. मात्र सचिनची भेट होऊ शकली नाही. अशावेळी त्यांच्या स्वीय सहाय्यकांना शाळेची माहिती असलेली पुस्तिका व अपेक्षित प्रस्ताव देण्यात आला. कोणी मध्यस्थ नसताना नवीन वर्षाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सचिन तेंडुलकर यांच्या निधीतून 50 लाख रुपयांची मदत मिळणार असल्याची माहिती शाळेच्या पदाधिकार्‍यांना मिळाल्याने तेही आश्‍चर्यचकित झाले.