Breaking News

सायना जखमी झाल्याने पीबीएलच्या सामन्यातू बाहेर


मुंबई,4 - देशाची सर्वोच्च महिला बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल जखमी झाल्याच्या कारणामुळे शनिवारी आपला संघ अवध वॉरियर्ससाठी प्रीमियर बॅडमिंटन लीग (पीबीएल) च्या पहिल्या सामन्यात भाग घेऊ शकली नाही. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये तिच्या डाव्या पायामध्ये त्रास सुरु झाला होता त्यामुळे तपासणीनंतर माहिती पडले की सायनाच्या डाव्या पायामध्ये सर्वांत मोठया पेशीमध्ये समस्या आहे आणि तिला काही आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला गेला. चीन ओपनच्या अंतिम सामन्यामध्ये ली ज्युरुई विरुध्द हरल्यानंतर सायनाने नोव्हेंबरच्या मध्यामध्ये हाँगकाँग ओपन  सुपरसीरीजमध्ये भाग घेतला नाही. 
सायनाने येथे पीबीएलच्या आपल्या संघाच्या सामन्यापूर्वीच म्हटले की मागील काही आठवड्यापासून जखमी असल्याने परेशान आहे. मी जवळपास बरी होत आहे. मी पूर्व बचाव स्विकारत कोर्टवर उतरण्यापूर्वी अजून थोडी विश्रांती घेऊ इच्छित आहे.  तिने म्हटलेकी मी आशा करते की मी लवकरात लवकर बरी होईल आणि पीबीएलमध्ये आपल्या संघासाठीचे उर्वरीत सामने खेळू शकेल. मैदाना बाहेर बसून संघाला ख्ेळताना पहिल्यांदाच पाहत रहावे लागणार आहे. फक्त दोन दिवस अजून विश्रांती मिळेल कारण त्याचा संघ अवध वॉरियर्सला सोमवारी लखनऊ बरोबर पीबीएलमध्ये आपला दुसरा सामना खेळायचा आहे.