Breaking News

4 फेब्रुवारी हा दिवस फ्रेण्डशिप डे म्हणून साजरा करा- झुकरबर्ग


न्यूयॉर्क, 13 - फेसबुकचा बारावा वर्धापनदिन म्हणजेच 4 फेब्रुवारी हा दिवस फ्रेण्डशिप डे म्हणून साजरा करा, असे आवाहन फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग याने 150 कोटी फेसबुक यूझर्सना केले आहे. 
दरवर्षी ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार जगभरात फ्रेण्डशिप डे म्हणून साजरा केला जातो. मात्र अनेकांचे दुरावलेले मैत्र पुन्हा जोडणारा आणि नवीन मित्र-मैत्रिणी शोधण्यास महत्त्वपूर्ण असणार्‍या फेसबुकचा फाऊण्डेशन डे मैत्रीदिन म्हणून साजरा व्हावा अशी झुकरबर्गची इच्छा आहे.
जानेवारी 2004 मध्ये मार्क झुकरबर्गने त्याच्या कॉलेज विद्यार्थ्यांना जोडणारी यंत्रणा म्हणून फेसबुकचे कोडिंग केले. मात्र 12 वर्षांमध्ये मित्र आणि आप्तांशी कनेक्टेड राहण्यासाठी जगभरातील अब्जावधी नागरिकांनी फेसबुकला जवळ केले. ‘4 फेब्रुवारीला तुम्ही षीळशपवीवरू सेलिब्रेट करण्यासाठी मला जॉईन व्हाल, अशी आशा आहे’ असे मार्कने एका फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. ‘जर तुमच्या मैत्रीची काही कथा असेल, तर मला कळवा. मला शक्य होईल तितके किस्से वाचायला आवडतील’ असेही मार्क म्हणतो.