Breaking News

पठाणकोट हल्ल्यातील जैश’च्या 10 दहशतवाद्यांना अटक



नवी दिल्ली, 13 -  पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पुन्हा एकदा त्यांच्या अधिकार्‍यांसोबत बैठक केली. जैश-ए-मोहम्मदच्या काही कार्यालयांना सील ठोकण्यात आले आहे. बहावलपूर, मुल्तान, येथून काही दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.
 भारत - पाकिस्तान यांच्यातील सचिव स्तरीय बैठक होणार की नाही याचा निर्णय गुरुवारी होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने या बैठकीबद्दल म्हटले होते, की भारतासोबत 15 जानेवारी रोजी चर्चा होणार. सूत्रांची माहिती आहे, की 15 जानेवारी ही तारीख पाकिस्तानकडून देण्यात आली होती, मात्र याबाबत भारताची सहमती नव्हती.  पठाणकोट हल्ला प्रकरणी भारत आता पाकिस्तानकडून कारवाई होण्याची वाट पाहात आहे. या चर्चेसाठी नव्याने तारीख निश्‍चित होण्याची शक्यता आहे.