मुंबई आयआयटी कॅम्पसमध्ये तरुणाची चाकूने भोकसून आत्महत्या
मुंबई, 18 - पवई आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये एका 20 वर्षीय विद्यार्थ्याने चाकून भोकसून आत्महत्या केली. मृत विद्यार्थी आयआयटीमधील प्राध्यापकांचा दत्तक मुलगा होता. पालक आणि बहिणीसोबतच्या वादानंतर या तरुणाने चाकूने भोसकून आयुष्य संपवले.
सोशल मीडियावरील त्याच्या एका पोस्टमुळे भांडण सुरु झाले. यानंतर तू आता मोठा झाला आहेस आणि पालकांची काळजी घ्यायला हवी, असे त्याची बहिण समजावत होती. मात्र यामुळे विद्यार्थ्याला प्रचंड राग आला. तो त्याच्या रुममध्ये गेला आणि छातीत चाकू भोसकला, अशी माहिती पवई पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक बी के मधेश्वर यांनी दिली. पालकांशी आणि विवाहित बहिणीशी चर्चा केल्यानंतर पवई पोलिसांनी अपघातातील मृत्यूची नोंद केली आहे. संबंधित विद्यार्थी चार वर्षांचा त्याच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला आणि तेव्हाच मावशीने त्याला दत्तक घेतले. त्याच्या मावशीने आयआयटी मुंबईतील एका वरिष्ठ प्राध्यापकाशी लग्न केले होते. पोलिस आणि कुटुंबाच्या नातेवाईकांच्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी मुलाने वडिलांना मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तुम्हाला माहित आहे का मी काय करु शकतो, असे म्हणत त्याने स्वत:ला भोसकून घेतले. त्याला जवळच्या हिरानंदानी रुग्णालयात
नेण्यात आले. परंत जखमा गंभीर असल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
