Breaking News

लग्नात भात वाढण्यावरुन मारामारी ः 2 जखमी


सांगली, 12 - भात वाढण्यावरुन लग्नातच दोन गटात जोरदार मारामारी झाली. झुलैलाल चौकातील एका मंगल कार्यालयात दुपारी ही घटना घडली. यामध्ये दोघे जखमी झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता. प्रवीण सीताराम कांबळे (20) व राहुल देवल कांबळे (25, दोघे रा. नदीवेस, मिरज) अशी जखमींची नांवे आहेत. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. दोघेही एका लग्नास गेले होते. तिथे जेवताना भात वाढण्यावरुन वाद झाला. त्याचे पर्यावसान मारामारीत झाले. पंधरा जणांच्या जमावाने दोघांना शिवीगाळ करुन लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. अनपेक्षित घडलेल्या या घटनेने लग्नात तणाव निर्माण झाला होता. काही लोकांनी मध्यस्थी करुन हे प्रकरण मिटविले. पण जखमी प्रवीण व राहुल रुग्णालयात उपचार घेऊन शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेले होते. पण रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झालेला नव्हता.