Breaking News

सरोगसीनं आई होणार्‍या महिलेला 180 दिवसांची रजा


मुंबई, दि. 22 : राज्य सरकानं  एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यापुढं सरोगसी पद्धतीनं अपत्य प्राप्त झालेल्या महिलेलाही बाळाच्या संगोपनासाठी 180 दिवसांची रजा मिळणार आहे. यासंदर्भात राज्य सरकारनं जीआर काढला आहे.
 सरकारी महिला कर्मचार्‍यांशिवाय, मान्यताप्राप्त आणि अनुदानित शैक्षणिक संस्थातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर महिला कर्मचार्‍यांना देखील हा निर्णय लागू होईल. आतापर्यंत फक्त नैसर्गिकरित्या अपत्यप्राप्ती होणार्‍या महिलांना 180 दिवसांची, तर बाळ दत्तक घेतल्यास 90 दिवसांची रजा मिळत असे.
या निर्णयामुळं यापुढे बाळासाठी सरोगसी पद्धतीचा अवलंब करणार्‍या महिलांना देखील 180 दिवसांच्या रजेचा लाभ घेता येणार आहे. मात्र, जर एखाद्या महिलेला मुलं असताना देखील ती दुसर्‍या अपत्यासाठी सरोगसीचा मार्ग वापरणार असेल, तर तिला रजेची सवलत मिळणार नाही.