Breaking News

पाच जणांना चिरडणारा कार चालक अटकेत


मुंबई, 22 -  क्रॉफर्ड मार्केट परिसरात काल रात्री आमिन खानच्या मर्सिडीज कारने चार महिला आणि एका लहान मुलाला चिरडले होते. या अपघातानंतर तो फऱार झाला होता. मात्र पोलिसांनी आज त्याच्या मुसक्या आवळल्या.
मुंबईत आणखी एक हिट अँड रनची घटना घडली आहे. क्रॉफर्ड मार्केट परिसरात एका भरधाव कारने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या पाच जणांना चिरडले. यात चार महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जे जे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरुन फरार झाला. फरार चालक हा बीएमसीचा कॉन्ट्रॅक्टर असल्याचे कळते.
गुरुवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास हा अपघात झाला. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि क्रॉफर्ड मार्केटजवळील मोहम्मद अली रोडच्या क
डेला झोपलेल्या पाच जणांच्या अंगावर कार चढवली.