Breaking News

गुलाम अलींचा ठाणे महोत्सवात कार्यक्रम - जितेंद्र आव्हाड


मुंबई, 17 - प्रसिध्द पाकिस्तानी गझल सम्राट गुलाम अलींचा फेब्रुवारी महिन्यात ठाण्यात गझल गायनाचा कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष प्रतिष्ठानतर्फे आयोजित ठाणे महोत्वसात गुलाम अलींचा कार्यक्रम होईल. गुलाम अलींनी या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरुन दिली. दरम्यान, आव्हाडांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी गुलामअलींना ठाण्यात बोलावूनच दाखवावे असे आव्हान शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आव्हाडांना दिले आहे. तर, शिवसेनेला जे करायचय ते करु दे अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी
दिली आहे.