Breaking News

11 जानेवारीला लघुव्यवसायीकांचा एक दिवस व्यवसाय बंद!


 बुलडाणा (प्रतिनिधी) । 10 - न्यायालयाचे आदेशाचे नावावर बुलडाणा शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमे दरम्यान उठविण्यात आलेल्या अतिक्रमण धारकांच्या व्यवसायावर निर्दयपणे वरवंटा फिरवला गेला. त्याचे पडसाद शहरभर उमटत असतांना अतिक्रमणात अनेक व्यवसायिकांची दुकाने तोडण्यात आली. सदर प्रकरणाची प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. मागील 20 तारखेला भर बाजाराचे दिवशी बाजारात आपले दुकान लावण्यासाठी गेलेले एका लघुव्यवसायीकास बाजारातील दुकानावरच हृदयविकाराचा झटका आल्यामुळे जागेवरच त्यांचे निधन झाले. दुसरे व्यवसायीक यांनी व्यवसाय बंद, काम नाही, पैसा नाही, कुटूंबाचा चरितार्थ, घरातील लग्न कार्य, आजारपण हे कसे चालेल? या विवंचनेत  गळफास घेवून आत्महत्या केली. अशा घटणा घडत आहे.
पर्यायी जागेवर पुर्नवसन करावे, त्यांना पक्के गाळे बांधून देण्यात यावे, नुकसान भरपाई मिळावी यासाठी 11 जानेवारी 2016 रोज सोमवारी एक दिवस आपला व व्यवसाय बंद ठेवून निषेध आंदोलनात सहभागी होवून आंदोलन यशस्वी करावे व आपली एकजुट दाखवून द्यावी अशी विनंती प्रकाश देशलहरा, सुभाष देशमुख, रहीम सेठ, इमरानखॉ अब्दुलखॉ, सुजीत देशमुख, मुकूंदा नागवंशी, राजेश लोखंडे, पवन गोलेच्छा, शेख जुबेर, भास्कर चौधरी, प्रदिप सोमवंशी, अभय सोनोने, चंदन, अनिल डवके, राजु महाळंकर, अरुण चोपडे, यांच्यासह इतरांनी केली आहे.