Breaking News

पुसेगावच्या यात्रेत 10 टँकरद्वारे पाणीपुरवठा


सातारा, 11 - श्री सेवागिरी महाराजांच्या पुण्यस्मरणार्थ पुसेगाव येथे भरलेल्या यात्रनिमित्त आलेल्या भाविकांना दुष्काळी स्थितीमुळे खटाव तालुका शिवसेनेतर्फे 10 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या टँकरचे लोकार्पण मठाधिपती सुंदरगिरी महाराज व सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या हस्ते झाला.
विश्‍वस्त मोहनराव जाधव, डॉ. प्र. ल. भुजबळ, विजय जाधव, शिवाजीराव जाधव, उपसरपंच व जनशक्ती संघटनेचे नेते रणधीर जाधव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रताप जाधव, भाजपचे तालुकाप्रमुख भरत मुळे, अंकुश पाटील, संभाजी नलवडे, दीपक तोडकर, दिनेश देवकर, सचिन गवळी, सुमित्रा शेडगे, मनोज गोरे, मिथुन बेंद्रे, निवृत्ती जगदाळे, चंद्रकांत जाधव उपस्थित होते. सध्याच्या दुष्काळी स्थितीत भाविकांची पाण्यापासून गैरसोय होऊ नये यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून येथील शिवसेनेतर्फे दरवर्षी यात्रेत मोफत पाणीपुरवठा करण्यात येतो. ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत जाधव यांच्या सहयोगातून टँकरद्वारे हा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. रथोत्सवानंतर पुसेगाव यात्रेकरुंनी फुलून जाते. यावेळी राज्यभरातून लाखो भाविक व शेतकरी बांधव तसेच हजारो खिलार जनावरे घेऊन येतात.