शहरातील 1 लाख 87 हजार बालकांना पोलिओ लसीकरण
पिंपरी (प्रतिनिधी) । 19 - केंद्रशासनाच्या सुचनेनुसार पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेतर्फे पल्स पोलीओ साजरा करण्यात आला, यामध्ये 1 लाख 87 हजार 384 बालकांना पोलीओचे लसीकरण करण्यात आले. अशी माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली.
महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते पिंपळे गुरव येथे या मोहिमेचे उद्घाटन झाले. यावेली नगरसेवक नवनाथ जगताप, वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ.वर्षा डांगे आदी उपस्थित होते.शहरात सुमारे 791 लसीकरण केंद्र, 8 प्रभारी वैद्यकीय अधिकारी, तीन हजार 971 लसीकरण कर्मचारी यांच्या सहकार्याने ही मोहीम काल पार पडली.यासाठी रोटरी क्लब, डॉ. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, अंगणवाडी कर्मचारी आदींनी सहकार्य केले. तर आज (सोमवारी) पासून पाच वर्षाखालील बालकांना लसीकरण झाले आहे की नाही याची खात्री करण्यासाठी माहापालिका कर्मचारी घरोघर जावून पहाणी करणार आहेत त्यासाठी नागरिकांनी त्यांना सहकार्य कारवे, असे अवाहनही महापालिकेने केले आहे.