Breaking News

नाशिकमध्ये पंचवटीतील मनपा मायको रुग्णालयाबाहेर प्रसुती प्रकरण : वैद्यकीय अधिकार्‍यासह 6 निलंबीत

नाशिक, दि. 26, ऑक्टोबर - नाशिकच्या पंचवटी विभागातील महापालिकेच्या मायको रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी हजर नसल्याने रुग्णालयाच्या बाहेर रिक्षात एका  महिलेची प्रसुती झाल्याच्या गंभीर प्रकाराची दखल महापालिका आयुक्तांनी घेतल्यानंतर आज वैद्यकिय अधिक्षकांनी मिळालेल्या प्राथमिक चौकशी अहवालानंतर येथील वैद्यकिय अ धिकार्‍यासह सहा कर्मचार्‍यांना निलंबीत करण्यात आले आहे. निलंबीत करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांत महापालिकेच्या रुग्णालयाचे प्रमुख असलेल्या वैद्यकिय अधिकार्‍याच्या पत्नीचा  समावेश आहे.
पंचवटीतील फुलेनगर भागात असलेल्या महापालिकेच्या मायको दवाखान्यात सोमवारी (दि.23) दुपारी रुग्णालयात कोणीच डॉक्टर व स्टॉफ नसल्याने एका महिलेची प्रसुती  रुग्णालयाच्या आवारात एका रिक्षात झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होेता.
अत्यावश्यक सेवा म्हणुन शहरात महापालिका रुग्णालयामार्फत आरोग्य सेवा पुरविली जात असतांना रुग्णालयात कोणीच नसल्याने हा गंभीर प्रकार समोर असल्याने शहरात संतप्त प्र तिक्रीया उमटली होती. स्थानिक नगरसेवक जगदिश पाटील, शांताबाई हिरे यांच्यासह स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी यासाठी नंतर असलेल्या वैद्यकिय विभागाच्या अधिकार्‍यांना  जाब विचारला होता.
या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले होते. यानुसार वैद्यकिय विभागातील वैद्यकिय अधिकारी डॉ. आरती चिरमाडे यांना या  घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. डॉ. चिरमाडे यांनी सोमवार व मंगळवारी अशी चौकशी करुन आपला अहवाल वैद्यकिय अधिक्षक डॉ. विजय डेकाटे यांच्याकडे  सादर केला. या चौकशी अहवालातील गंभीर प्रकाराची दखल घेत वैद्यकिय अधिकार्‍यांसह सहा जणांना निलंबीत करण्यात आले असल्याची माहिती डॉ. डेकाटे यांनी दिली.
या गंभीर प्रकरणी महापालिका प्रशासनाला मिळालेला चौकशी अहवाल हा रुग्ण महिला, तिचे नातेवाईक, प्रसुतीला मदत करणार्या महिला, स्थानिक नागरिक यांचा लेखी जबाबावरुन  तयार करण्यात आला आहे. चौकशी अहवालात लेखा जबाबावरुन आलेल्या महितीवरुन मोनिका साकेत ही महिला सकाळी साडे अकरा वाजता रुग्णालयात आली होती. मात्र यावेळी  श्रीमती रुपवते यांनी तिला तपासुन जास्त पोट दुखल्यानंतर ये असे सांगुन तिला काढुन दिले. दुपारी 2 वाजता ही महिला जास्त पोट दुखू लागल्यानंतर रुग्णालयात आली.
यावेळी वैद्यकिय अधिकारी इतर स्टाफ नर्स, फार्मासिस्ट व आया कोणीच हजर नव्हते. तर सुरक्षा रक्षक गच्चीवर पतंग उडवित होता. याठिकाणी ड्युटीवर असलेल्या कर्मचारी रुपवते  व शिंदे ड्युटी संपण्यापुर्वीच निघुन गेल्या होत्या. श्रीमती ठाकुर यांची दुपारी 2 वाजता ड्युटी असतांना त्या आलेल्या नसल्याने रुग्णालयाच्या आवारात असलेल्या रिक्षात बसलेल्या  महिलेची प्रसुती स्थानिक महिलांच्या मदतीने केली जात असतांना आया म्हणुन काम करणार्या श्रीमती देसले यांनी आल्यावर याकरिता लागणारे साहित्य आणुन ही प्रसुतीचे काम  पुर्ण केले.
दुपारी तीनच्या सुमारास रुपवते व शिंदे यांनी रुग्णालयात येऊन रुग्ण महिलेला मदत केली. अशाप्रकारे एकुणच प्रकार स्थानिक महिलांच्या लेखी जबाबातून समोर आला आहे. हा  चौकशी अहवाल आज वैद्यकिय अधिक्षक डॉ. डेकाटे यांना मिळाल्यानंतर त्यांनी अतिरीक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्यासोबत चर्चा करुन यातील दोषी कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई  केली.
याठिकाणी ठेकेदारामार्फत असलेल्या दोन सुरक्षा रक्षकांना सोमवारीच बडतर्फ करण्यात आल्याचे सांगण्यात आले. याचबरोबर जे दोन स्टाफ गैरहजर असल्याचे चौकशीत दिसुन  आले, त्या स्टाफ दुसरीकडे कामावर असल्याची चर्चा आता शहरात सुरू आहे. निलंबीत करण्यात आलेल्या श्रीमती कोठारी या पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयाचे प्रमुख डॉ. जे.  झेड. कोठारी यांच्या पत्नी असल्याचे समोर आले आहे.