Breaking News

दुधाला अनुदानासह योग्य दर मिळण्यासाठी निवेदन


श्रीगोंदा / प्रतिनिधी 
दुधाला अनुदान आणि योग्य भाव मिळण्याची मागणी शेतकरी अनेक वर्षांपासून करत आहे. मात्र याकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असताना दिसून येत आहे. गायीच्या दुधाला प्रतिलिटरमागे किमान 5 रूपये अनुदान मिळावे, आणि ते शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये थेट जमा करण्याचा निर्णय सरकारने तात्काळ घ्यावा अन्यथा मुंबई-पुणे या शहरांकडे करण्यात येणारा दुध पुरवठा 16 जुलैपासून रोखण्यात येवून, दुधाचे संकलनही बंद करण्यात येईल असा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दुधाचा व्यवसाय करणे शेतकर्‍यांच्या खिशाला मोठी झळ सोसण्यासारखा झाला आहे. 
गायीच्या दुधाला प्रतिलिटर 30 रूपये आणि म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर 40 रूपये दर मिळावा तसेच आर्थिक संकटामध्ये सापडलेल्या दुध उत्पादक शेतकर्‍यांना कर्नाटक, गोवा, केरळ या राज्यामध्ये गायीच्या दुध विक्रीवर ज्याप्रमाणे प्रतिलिटर 5 रूपये अनुदान देण्यात येते, त्याचधर्तीवर महाराष्ट्रातदेखील गायीच्या दुधावर अनुदान द्यावी अशी सर्व शेतकरी वर्गाची मागणी आहे. अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने तात्काळ घ्यावा अन्यथा दि. 17 जुलै रोजी सकाळी 9 वा. नगर-दौंड रोडवरी अजनुज चौक काष्टी येथे सर्व दुध उत्पादक शेतकर्‍यांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याबाबतचे निवेदन श्रीगोंदा तहसीलदार यांना देण्यात आले आहे.