माहिती दिल्याच्या संशयावरुन मारहाण
संगमनेर प्रतिनिधी
दारुची अवैधपणे विक्री करणार्या आरोपीची पोलिसांना माहिती दिल्याच्या संशयावरुन दोन तरुणांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण आली. या मारहाणीत दोघांच्या खिशातील २८ हजार रुपये रोख रक्कम व हातातील सहा ग्रॅमची सोन्याची अंगठी काढून नेली.
सोमवारी घडलेल्या या घटनेप्रकरणी तालुका पोलिसांनी विविध कलमाखाली आठ जणांवर गुन्हा दाखल केला. भारत जाधव (रा. अकोले, हल्ली मुक्काम : पिंपरी, नाशिक) यांनी फिर्याद दिली. जाधव त्यांचा मित्र सुरेश पवार (रा. अकोले) यांच्यासमवेत दुचाकीवरुन खांडगाव (ता. संगमनेर) येथे दर्शनसाठी आले होते. दर्शन करुन ते अकोलेकडे जात असताना धांदरफळ शिवारात आरोपी अमेय माधव मुळे (रा. धांदरफळ बु.) व त्याच्या इतर सात साथीदारांनी जाधव यांच्या दुचाकीला आडवी त्याचे वाहन आडवे लावून रस्ता अडवला. त्यानंतर जाधव त्यांच्या मित्राला शिवीगाळ करत आमची दारु पकडून देता काय, असे म्हणून जाधव त्यांच्या मित्राल सात जणांनी लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. पुढील तपास सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस करत आहेत.
