Breaking News

‘मुद्रा लोन’च्या योजनेत लक्ष घाला : साळवे


राहुरी प्रतिनिधी -


केंद्र सरकारने सुशिक्षित बेरोजगार व छोट्या उद्योगधंद्यांसाठी राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून मुद्रा लोन योजना जाहीर केली. मात्र प्रत्यक्षात हे कर्ज मंजूर होताना अनेक जाचक नियम, अटींची पूर्तता करावी लागत आहे. हे करीत असतांना लाभार्थ्यांसह वंचित घटकांना अडचणी येत आहेत. बँका अडवणूक करत आहेत, यासाठी श्रीरामपूर विभागाचे प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी यात लक्ष घालावे, याबाबतचे निवेदन राहुरी तालुका रिपाइंचे युवाध्यक्ष सचिन साळवे यांनी चव्हाण यांना नुकतेच दिले. 

यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ आदेश देत बँकेच्या अधिकाऱ्यांची याबाबत प्रांताधिकारी कार्यालयात बैठक लावण्याचे चव्हाण यांनी सूचित केले. याप्रसंगी सचिन साळवे, रिपाइंचे युवा उपाध्यक्ष निलेश जगधने, सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत वाघचौरे आदी उपस्थित होते.