Breaking News

पावसामुळे पिकांना मिळाले जीवदान


नेवासा : पाण्याअभावी सुकत चाललेल्या उभ्या पिकांना मागील आठवड्यात झालेल्या संततधार पावसाने चांगलेच जीवदान मिळाले आहे. नेवासा तालुक्याच्या अनेक भागांत य पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पिके आणि चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे. पावसाअभावी या भागातील ऊस, मका, बाजरी आदी पिकांतील गवत सुकून चालले होते. शेतात नक्की कुठे गवत घ्यावे, असा प्रश्न महिलांना पडला होता. गायींसाठी गवत घेण्यासाठी महिलांवर ठिकठिकाणी भटकंती करण्याची वेळ आली होती. मात्र मागील आठवड्यात नेवासे तालुक्यासह सोनई आणि अन्य परिसरात झालेल्या पावसाने शेतात ठिकठिकाणी विविध पिकांसह गवत चांगलेच वाढले आहे. घास , मका आणि ऊस आदींचा चारा म्हणून वापर होत आहे. मात्र पावसाने गवत वाढल्याने हा चारा वाचविण्यावर भर दिला जात आहे.