Breaking News

आपत्ती व्यवस्थापन बैठक उत्साहात


कोल्हार प्रतिनिधी : 

कोल्हारमधील ओढे, चर व नाले यावर झालेले अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढणे तसेच पावसाचे पाणी वाहून जाण्याकरिता मार्ग मोकळा करून वहिवाटीचा अडथळा दूर करणे आदी विषयांवर राहाता तहसीलदारांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापन बैठक पार पडली. 

या कामास सोमवारी प्रत्यक्ष प्रारंभ होणार आहे. त्यामुळे कोल्हारमधील बुजलेले ओढे, नाले व चर मोकळा श्वास घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतच्या कार्यालयात तहसीलदार माणिकराव आहेर यांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापन बैठक पार पडली. यावेळी गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, नायब तहसीलदार राहुल कोताडे, लोणीचे स. पो. नि. रणजित गलांडे, कनिष्ठ अभियंता रविंद्र चौधरी, कोल्हारचे माजी सरपंच ऍड. 

सुरेंद्र खर्डे, उपसरपंच स्वप्नील निबे, ग्रा. स. ज्ञानेश्वर खर्डे, पंढरी खर्डे, रमेश निबे, कोल्हारच्या तलाठी सुरेखा अबुज, भगवतीपुरच्या तलाठी पी. एन. वाडेकर, ग्रामसेवक एस. ए. चौरे आदींसह विविध खात्यामधील अधिकारी उपस्थित होते.