Breaking News

थोरात महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमास मान्यता


संगमनेर प्रतिनिधी 

तालुक्यातील विद्यार्थी व पालकांची मागणी विचारात घेता शैक्षणिक वर्षे २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी राज्य शासन व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्यावतीने एम. एस्सी ( ऑरगॅनिक कॅमिस्ट्री ) व एम कॉम या पदव्युत्तर अभ्यासक्रमास मान्यता मिळाली आहे, अशी प्राचार्य डॉ. आर. के. दातीर यांनी दिली.

माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात व आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यालयाने गुणवत्ता जपली आहे. उत्कृष्ठ निकाल, प्रशस्त लॅब, शैक्षणिक गुणवत्ता यामुळे विद्यालयाचा राज्यात मोठा लौकिक आहे. विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या मागणीवरुन वाढीव तुकडीसाठी महाविद्यालयाने महाराष्ट्र शासन व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांचेकडे प्रस्ताव सादर केला होता. याकामी संस्थेचे सचिव चंद्रकांत कडलग, रजिस्ट्रार बाबुराव गवांदे, प्राचार्य डॉ. आर. के. दातीर, उपप्राचार्य प्रा. एस. डी. नवले , प्रा. जी. जे. थोरात, कार्यालयीन अधिक्षक जी. एन. पानसरे व केमिस्ट्री विभागप्रमुख डॉ. एस. एस. बोर्‍हाडे यांनी विशेष परिश्रम घेतले. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल माजी शिक्षणमंत्री आ. बाळासाहेब थोरात , आ. डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी अभिनंदन केले आहे.