भंडारा शहरात मोकाट जनावरामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत असून या जनावरामुळे बऱ्याचदा अपघात ही झालेे आहे. मात्र नगर परिषद आणि वाहतूक पोलीस या कडे पूर्ण पणे दुर्लक्ष करीत आहे, भंडारा शहरातील गांधी चौक, विशेष म्हणजे नगर परिषद च्या गेट समोर चा हा चौक, इथे हि मोकाट जनावरे थान्ड मांडून बसले आहेत. जणू आपल्या मागण्यांना घेऊन उपोषण करत असल्या सारख्या त्या बिनधास्त बसल्या आहेत. या मुळे वाहतुकीला अडचण हि होत आहे. मात्र इथे असणारा वाहतूक पोलीस आणि नगर पालिकेचे कर्मचारी आणि सत्ताधा ऱ्या ना काही दिसत नसल्यासारखे वागत आहेत. बहुतेकदा मोठा अपघात होण्याची हे सर्वच लोक वाट पाहत असणार त्या नंतरच याना आपल्या कर्तव्याची जाणीव होणार काय ? हा मार्ग वरदळीचा असल्याने या ठिकानी मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम होत असते. त्यावर जनावरे रोडवर बसत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्याकरिता जो पर्यंत मोठी घटना होणार नाही तो पर्यंत गांधीजीच्या माकडा प्रमाणे पोलिस व नगरपरिषद प्रशासन वागणार काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.