Breaking News

सेामटणे फाटयाजवळ अपघात, स्टील पटटी कारच्या आरपार


पुण्याहून मुंबईला जाताना सोमाटणे फाटा पुलाजवळ कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या सुरक्षा पट्टीला धडकली. यामध्ये स्टील पट्टी कारच्या आरपार झाली. या भीषण अपघात कारमधील तिघेजण गंभीर जखमी झाले. तर एकजण किरकोळ जखमी झाला आहे. हा अपघात आज (मंगळवारी) पहाटेच्या सुमारास झाला. जखमींवर नजीकच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अमोल पाटील, श्रीमंत कृष्े आणि प्रकाश वाईगडे (सर्व रा. मीरा भाईंदर) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. सूर्याजी भोंदे (चालक) यांना किरकोळ जखम झाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सर्वजण दोन दिवसांपूर्वी काही कामानिमित्त त्यांच्या गावी कोल्हापूरला कार (एम एच 05 / सी एम 3555) मधून गेले होते. सोमवारी (दि. 2) रात्री सर्वजण कोल्हापूरवरून निघाले, आज पहाटे सहाच्या सुमारास पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर सोमाटणे पुलाजवळ कार आली असता, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या सुरक्षा पट्टीला धडकली. कारचा वेग जास्त असल्याने स्टीलची सुरक्षा पट्टी कारमधून आरपार झाली. या भीषण अपघातात अमोल, श्रीमंत आणि प्रकाश गंभीर जखमी झाले, तर सूर्याजी यांना किरकोळ इजा झाली. जखमींना तात्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.