पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीची आत्महत्या
नवी दिल्ली : एका अल्पवयीन मुलीने थेट पोलीस ठाण्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दिल्लीच्या टिळक विहार पोलीस ठाण्यात ही घटना घडली. पोलिसांनी बोलविल्यानंतर पोलीस ठाण्यात मुलगी लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे मुलीच्या आईने म्हटले आहे. मुलीच्या आईने घराशेजारी राहणार्या व्यक्तींवर आरोप केले आहेत. घराशेजारी राहणार्यांनी आपल्या मुलीचे अपहरण केले. त्यांच्या मुलाशी आपल्या मुलीने लग्न करावे अशा त्यांचे म्हणणे होते. मात्र, मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्या लग्नास आपण नकार दिला. पोलीस ठाण्यात बोलविल्यानंतर एका खोलीत मुलगी लटकलेल्या अवस्थेत आढळल्याचे मुलीच्या आईने म्हटले आहे. तर दुसर्या खोलीत तिच्या तीन मुलांना डांबण्यात आल्याचा आरोप मुलीच्या आईने केला.