राज्य सरकार अल्पमतात : चव्हाण
भाजपकडून लोकशाहीची पायमल्ली ; सरकार अल्पमतात असूनही विधेयके मंजूर करत असल्याचा आरोप
नागपूर : पावसाळी आधिवेशनात शिवसेनेच्या आमदारांनी नाणार प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेत आंदोलन केल्यामुळे सरकार अल्पमतात असल्याचे वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरूवारी केले. राज्य सरकार अल्पमतात असतांना देखील विधानसभेत विधेयके मंजूर करून घेतली जात आहेत. याप्रकारामुळे भाजपकडून लोकशाहीची पायमल्ली होत असल्याचा आरोप देखील चव्हाण यांनी यावेळी केला.
नाणार प्रकल्प भाजप सरकार जबरदस्तीने कोकणवर लादत आहे. केंद्र सरकार राज्य सरकारलादेखील विश्वसात घेत नाही. मुख्यंत्र्यांच्या अनुपस्थितीत सौदी अरेबियाच्या कंपन्यांसोबत करार केले जातात. या करारतून महाराष्ट्राला काय फायदा होणार आहे, असा प्रश्नदेखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. या प्रकल्पासाठी पाकिस्तानी अभियंते काम करत आहेत. त्यामुळे राष्ट्राच्या सुरक्षेलाही धोका असल्याची भिती त्यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी नाणार प्रकल्पाबाबत सभागृहात तत्काळ भूमिका स्पष्ट केली पाहिजे. त्यांनी पंतप्रधान मोदींना भेटून हा प्रकल्प रद्द करण्याची घोषणा केली पाहिजे, अशी त्यांनी केली आहे