Breaking News

भारतीय वंशाच्या दोन महिला फोर्ब्सच्या यादीत

नवी दिल्ली : भारतीय वंशाच्या दोन महिलांच्या नावाचा समावेश फोर्ब्सच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. फोर्ब्सच्या सेल्फ मेड वूमनच्या यादीत जयश्री उल्लाल आणि निरजा सेठी यांचा समावेश करण्यात आला. फोर्ब्सने अमेरिकेत स्वत: च्या कर्तृत्वावर ठसा उमटवणार्‍या 60 श्रीमंत महिलांची यादी जाहीर केली आहे. या यादीत 21 वर्षीय टीव्ही कलाकार आणि उद्योजक काईली जेनरच्या नावाचाही समावेश आहे. स्वत: च्या परिश्रमातून वेगळे स्थान निर्माण करणार्‍या महिलांच्या या यादीत जयश्री या 18व्या स्थानावर आहेत. तर निरजा या 21 व्या क्रमांकावर आहेत. जयश्री उल्लाल (वय 57) यांचा जन्म लंडन येथे झाला, पण त्यांचे पालन-पोषण भारतात झाले आहे. अरिस्टा नेटवर्क या कॉम्प्युटर नेटवर्किंग फर्ममध्ये त्या 2008पासून कार्यरत आहेत. जयश्री यांची एकूण संपत्ती 8800 कोटी रुपये (1.3 अरब डॉलर) आहे. निरजा सेठी (वय 63) सिन्टेल या कंपनीत कार्यरत आहेत. ही कंपनी आऊटसोर्सिंग आणि आयटी विषयक कन्सल्टिंगचे व्यवहार करते. या कंपनीची स्थापना निरजा आणि त्यांचे पती भरत देसाई यांनी 1980मध्ये केली होती. निरजा यांची संपत्ती एकूण 6800 कोटी रुपये (1 अब्ज डॉलर) आहे.